महाराष्ट्र विधानसभा २०१९ : एमआयएमने घोषित केली चार उमेदवारांची यादी , वंचित- एमआयएमच्या आघाडीची शक्यता मावळली

वंचित बहुजन आघाडीशी फारकत घेतलेल्या एम आय एम ने नरमाईची सूर आळवीत पुन्हा एकदा जुळेल अशी अशा ढलेली असताना वंचित बहुजन आघाडीने त्यांची कुठलीही दाखल न घेतल्याने आज अखेर आपले चार उमेदवार घोषित करून आता पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे एमआयएम-वंचित आघाडी होणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीनेच ही यादी जाहीर करत असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. पत्रकाखाली एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष, खासदार इम्तियाज जलील यांची स्वाक्षरी आहे. आतापर्यंत एमआयएमने सात उमेदवार जाहीर केल्याचं पत्रकात म्हटलं आहे. आज जाहीर केलेल्या यादीत एमआयएमने सांगोला (सोलापूर) मतदारसंघातून शंकर भगवान सरगर, सोलापूर मध्यमधून फारुख मकबूल शाब्दी, सोलापूर दक्षिणमधून सुफिया तौफिक शेख आणि पुणे छावणीमधून हिना शफीक मोमीन यांची उमेदवारी घोषित केली आहे. एमआयएमने यापूर्वी तीन उमेदवारांची घोषणा केली होती. आतापर्यंत एमआयएमने सात जागांवर त्यांचे उमेदवार घोषित केले आहेत. त्यामुळे एमआयएम-वंचित यांची आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.