डॉक्टरांनी “तिला ” मृत घोषित केले , पण “ती ” स्मशानातूनही घरी परतली !!

good news, hands holding paper with text concept, positive media
सर्पदंश झालेल्या एका युवतीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तिच्या कुटुंबीयांनी अर्थातच दुखद अंत:करणाने तिच्या अंत्ययात्रेची तयारी केली, तिला स्मशानातही नेले पण अंत्यविधीची तयारी सुरु असतानाचा झोपेतून उठावी तशी ती तरुणी उठून बसली तेंव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि मृत्युच्या दाढेत गेलेली तरुणी परत आल्याने सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू आले अशी ही घटना आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी आहे कि, भरतपूरच्या आरबीएम रुग्णालयात एका २१ वर्षीय तरुणी श्वेताला सर्पदंश झाल्याने मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर स्मशानभूमीत तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. इतक्यात असा काही प्रकार झाला की सगळ्यांनाच धक्का बसला. अचानक मृत तरुणीचा श्वास पुन्हा सुरू आल्याने जितका आनंद झाला तितका सगळ्यांना धक्काही बसला.
डॉक्टरांनी जेव्हा श्वेताला मृत घोषित केलं त्यानंतर तिला स्मशानभूमीत नेण्यात आलं. यावेळी श्वेता जिवंत असल्याचा काहींना संशय आला आणि त्यानंतर त्यांनी तिला पाहिलं तर जिवंत असल्याचं समोर आलं. श्वेता जिवंत असल्यामुळे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नव्हता. तिला सगळ्यांनी घरी आणलं. सर्पदंश झाल्यामुळे तिच्यावर योग्य उपचार करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, तिची स्थिती आता ठिक असल्याचंही सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्मशानात श्वेतावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू होती. यावेळी ती जिवंत असल्याचा संशय उपस्थित काही लोकांना आला. तिचा श्वास सुरू होता आणि ती उठून बसण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर तिची नाडी तपासली असता ती जिवंत असल्याचं समोर आलं. तिला जिवंत पाहून सगळ्यांना आधी धक्का बसला. श्वेता जिवंत असल्याची माहिती सगळ्यांना देण्यात आली. तर श्वेताचा जीव वाचला म्हणजे हा चमत्कारच असल्याची चर्चा सध्या सगळ्या गावात आहे.
श्वेताला सर्पदंश झाला होता. त्यावर तिला तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. पण रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. घरातल्या तरुण मुलीला अशा प्रकारे गमावल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली होती. पण अगदी स्मशानात गेल्यानंतर मुलीचे प्राण परत आल्यामुळे च्या चेहऱ्यावर आनंद पसरला.