Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : दुचाकी चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात, चोरीच्या चार दुचाकी जप्त

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : सराईत दुचाकी चोरांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाख ५ हजार रूपये विंâमतीच्या चोरीच्या चार दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. योगेश चुन्नीलाल लोदवाल (वय २६, रा. वेरूळ, ता. खुलताबाद), शेख शकील शेख शब्बीर (वय २५, रा. हिवरखेडा रोड, मोमीनपुरा, कन्नड, ह. मु. टाऊन हॉल, औरंगाबाद) आणि भरत मोतीलाल लोदवाल (रा. जामडी, ता. चाळीसगाव) अशी दुचाकी चोरांची नावे आहेत.

Advertisements

खुलताबाद तालुक्यातील माढेगाव येथील शेर खान शेख लाल शेख (वय ४३) यांची दुचाकी ९ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास कसाबखेडा येथून चोरीला गेली होती. त्यावरुन त्यांनी १२ सप्टेंबर रोजी खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव, वेरूळ येथून देखील दुचाकी चोरीला गेल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरांची शोध मोहिम सुरू केली होती. पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक संदीप साळुंके, जमादार विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, पोलिस नाईक नदीम शेख, बाबासाहेब नवले, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संजय तांदळे यांनी तांत्रिक दृष्ट्या तपास करुन सुरूवातील योगेश लोदवाल याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

Advertisements
Advertisements

त्याच्या चौकशीतून त्याच्या आणखी दोन साथीदारांची नावे समोर आली. त्यावरुन पोलिसांनी शेख शकील आणि भरत लोदवाल यांना पकडले. तेव्हा त्यांनी जालना, वैजापुर आणि शहरातील काही भागांमधून देखील दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चार दुचाकी हस्तगत केल्या असून, सध्या हे तिघे खुलताबाद पोलिसांच्या ताब्यात आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!