Uttar Pradesh : अखेर भाजप नेता चिन्मयानंदला विद्यार्थीनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात एसआयटीने ठोकल्या बेड्या

बहुचर्चित लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अखेर माध्यमांनी प्रकरण उचलून धरल्याने प्राथमिक पुराव्याच्या आधारावर लॉ कॉलेजातील विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना आज सकाळी अटक करण्यात आली. शहाजहांपूर येथील आश्रमातून विशेष तपास पथकानं (एसआयटी) चिन्मयानंद यांना ताब्यात घेतले.
चिन्मयानंद यांनी स्वत:च्या मालकीच्या लॉ कॉलेजमधील एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा व तिचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. चिन्मयानंद यांच्यावर आरोप झाल्यानंतर उत्तर प्रदेशात मोठा राजकीय गदारोळ झाला होता. चिन्मयानंद निर्दोष असल्याचं सांगत त्यांचे पाठीराखे रस्त्यावर उतरले होते. मात्र, पीडित विद्यार्थिनीनंही माघार न घेता या संदर्भातले अनेक व्हिडिओ जाहीर केले होते. त्यानंतर चिन्मयानंद यांना अटक करण्याच्या मागणीनं जोर धरला होता. चिन्मयानंद यांना अटक न झाल्यास आत्महत्या करण्याची धमकी पीडित मुलीनं दिली होती. हे प्रकरण चिघळणार असं दिसताच चक्रे फिरली आणि आज अखरे अटकेची कारवाई झाली.
चिन्मयानंदच्या विरोधात तक्रार केलेली तरुणी कायद्याची विद्यार्थिनी असून तिने १२ पानांची तक्रार आणि जबाब एसआयटीच्या अधिकाऱ्यांना दिली होती. सदर पिडीतेचा स्नानगृहातील व्हीडीवो बनवून चिन्मयानंदने ब्लैकमेल करून तिच्यावर वर्षभर बलत्कार केले. या प्रकरणात एसआईटीने आवश्यक टी चौकशी केल्यानंतर हाती लागलेल्या पुराव्यावरून अखेर चिन्मयानंदला बेड्या ठोकल्या.