महाराष्ट्र विधानसभा २०१९ : काँग्रेसच्या प्रभारींची नावे जाहीर , मराठवाड्याची जबाबदारी राजीव सातव यांच्यावर

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पक्षीय पातळीवरील नियोजनाला अधिक प्राधान्य दिले असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी राज्यातील विभागांच्या प्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. यामध्ये मुकुल वासनिक,अविनाश पांडे, रजनी पाटील,आर.सी. खुंटिया,राजीव सातव यांचा समावेश आहे.
विदर्भ विभागासाठी मुकुल वासनिक, मुंबई विभाग व निवडणुक नियंत्रण कक्षाच्या प्रभारीपदी अविनाश पांडे, पश्चिम व कोकण विभागासाठी रजनी पाटील, उत्तर महाराष्ट्र आर.सी. खुनतिया तर मराठवाडा विभागासाठी राजीव सातव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार काँग्रेस १२५, राष्ट्रवादी १२५ आणि मित्रपक्ष ३८ जागांवर लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान काँग्रेसच्या ५० उमेदवारांची पहिली यादी २० सप्टेंबर रोजी जाहीर होणार असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.