महाराष्ट्रासह हरियाणा झारखंड या तिन्हीही राज्यांच्या निवडणूक १९ सप्टेंबरला जाहीर होण्याची शक्यता

महाराष्ट्रासह हरयाणा, झारखंड या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग १९ सप्टेंबर रोजी जाहीर करण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरयाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना सर्वात आधी जाहीर होईल.
डिसेंबरआधी तिन्ही राज्यांच्या निवडणुका होणार असून झारखंड विधानसभेची निवडणूक शेवटी होईल. झारखंड विधानसभेसाठी अनेक टप्प्यांत मतदान होणार आहे.
महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकांच्या तारखा २० सप्टेंबर रोजी जाहीर झाल्या होत्या आणि मतदान १५ ऑक्टोबरला होते. झारखंड विधानसभा २०१४ च्या निवडणुकांसाठी पाच टप्प्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत मतदान पार पडले होते. यावर्षीदेखील ऑक्टोबरमध्ये या तिन्ही राज्यांच्या विधानसभांसाठी मतदान होण्याची शक्यता आहे.