Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Honor Killing : प्रेमविवाह केलेल्या मुलीवर आणि तिच्या नवऱ्यावर घातल्या गोळ्या

Spread the love

चार महिन्यांपूर्वी प्रेम विवाह करणाऱ्या लेकीला आणि तिच्या नवऱ्याला मुलीच्या कुटुंबीयांकडून मारून टाकण्यात आलं आहे. दोघांवरही त्यांच्याच घरात घुसून गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये मुलगी आणि तिच्या नवऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नौशेरा धाला गावात राहणाऱ्या अमनदीप सिंगचे अमनप्रीत कौर नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. मुलीचे कुटुंबीय त्यांच्या प्रेमाविरोधात होते. पण असं असतानाही, चार महिन्यांपूर्वीच या दोघांनी कुटुंबाविरूद्ध लग्न केलं. पण मनाविरुद्ध घरातल्या लेकीने विवाह केल्यामुळे कुटुंबीय या दोघांवर नाराज होते. अखेर नाराजी काढण्यासाठी त्यांनी दोघांचीही हत्या केली. प्रेम करून विवाह केल्यानंतर दोघांचा सुखी संसार सुरू असल्याची माहिती अमनदीप आणि अमनप्रीत यांच्या शेजाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

या प्रेमी जोडप्याचा सुखी संसार अशा प्रकारे विझल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मुलीच्या सुखाचा विचार न करता कुटुंबीयांनी मुलीला आणि तिच्या नवऱ्याला संपवलं. या दोघांना संपवण्यासाठी कुटुंबीयांनी मोठा कट रचला होता. रविवारी संधी पाहून मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी दोघांवरही गोळीबार केला. ज्यात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!