जितेंद्र आव्हाडांनी केली उदयन राजे यांच्या बालिशपणाची आठवण !!

उदयनराजे भोसले यांनी अमित शाह यांच्या उपस्थित दिल्लीमध्ये शनिवारी भाजपात प्रवेश केला. उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
मी उदयनराजेंना नेता मानत नसल्याचे आव्हाड यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. उदयनराजे भोसले यांच्या बालिश चाळ्यांना शरद पवार यांनी नेहमीच पाठीशी घातले. पवारांचा त्यांच्यावर जीव होता, पण उदयनराजेंनी पवारांना काय दिले? अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशानंतर ट्विट करतही जितेंद्र आव्हाड यांनी तोफ डागली आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले की, ‘साहेब, उदयनराजेंवर तुम्ही मनापासून प्रेम केलं. साताऱ्यातील जवळच्या सहकाऱ्यांना दुखावलंत. त्यांच्या सगळ्या आचरट बालिश चाळ्यांना पाठिशी घातलंत. त्यांच्यावर पोटच्या पोरासारखं प्रेम केलंत. साहेब काय मिळालं?’