जिवा-भावाची मोठी बहीण राहिली नाही म्हणून लहान बहिणीचाही धक्क्याने झाला मृत्यू !!अन दोघींचीही निघाली सोबत अंत्ययात्रा…

उत्तर प्रदेशच्या मथुरा नजीकच्या जैत या गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेत जीवाला जीव देणारी, जिवा-भावाची बहीण राहिली नाही याचा धक्का बसल्याने बहिणीच्या मृतदेहाजवळ टाहो फोडणाऱ्या लहान बहिणीचा आवाजही अखेर कायमचा बंद झाला आणि मोठ्या बहिणीबरोबर तिनेही जगाचा निरोप घेतला त्यामुळे वातावरण अधिकच शोकाकुल झाले.
या घटनेविषयी ग्रामस्थांनी सांगितले कि , रामसिंग यांच्या दोन मुली होत्या. त्यांच्यामध्ये ९ वर्षांचा फरक होता. मोठी बहिण मोहन देवीचं लग्न चौमुहान गावचचा रहिवासी केशवदेवशी झालं होतं तर लहान बहिण शीला हीचंही त्याच कुटुंबात लग्न झालं होतं. त्यामुळे या दोघी बहिणाींच्या जाण्यामुळे या कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहन देवी हिचं दीर्घ आजारामुळे बुधवारी ११ सप्टेंबर रोजी निधन झालं. आपल्या मोठ्या बहिणीच्या मृत्यूने शीलाला मोठा धक्का बसला. तिने मोहन देवीच्या मृतदेहाला घट्ट मिठी मारली होती. पण जेव्हा तिच्या रडण्याचा आवाज बंद झाला तेव्हा तिचाही मृत्यू झाल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं. जेव्हा शीलाच्या रडण्याचा आवाज बराच वेळ आला नाही आणि ती तिथून हलली नाही तेव्हा लोकांना संशय आला. त्यानंतर कुटुंबीयांनी शीलाला उठवण्यास सुरुवात केली. पण तिने काहीही उत्तर दिलं नाही. तेंव्हा बहिणीच्या जाण्याच्या धक्क्यात शीलाचाही मृत्यू झाल्याचं समोर आलं. यानंतर दोघींचीही एकत्र अंत्ययात्रा काढण्याची वेळ कुटुंबीयांवर आली.