Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Uttarpradesh : सततच्या अपमानाला कंटाळून तरुण मागासवर्गीय अधिकाऱ्याची आत्महत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

स्थानिक नेते आणि संघटनेच्या पुढाऱ्यांकडून होणाऱ्या सततच्या अपमानाला कंटाळून उत्तर प्रदेशातील एका २३ वर्षीय मागासवर्गीय  अधिकाऱ्याने शुक्रवारी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. त्रिवेंद्र कुमार गौतम असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

Advertisements

ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांनी सेवेला सुरुवात केली होती. गेल्या वर्षी त्यांना कुंभी गटामध्ये नियुक्त करण्यात आले होते. बुधवारी रात्री त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह लखीमपूरपासून १३० किलोमीटरवरील शिवसागर परिसरात सापडला.

Advertisements
Advertisements

मृतदेहाजवळ वडिलांच्या नावे लिहिली चिठी सापडली. त्यात एका शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष, रसूलपूरचा सरपंच आणि अन्य एका सरपंचाचा मुलगा आपल्या आत्महत्येसाठी दोषी असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी या सर्वांनी मिळून गौतम यांचा एका बैठकीत अपमान केल्याचा व्हिडिओ या परिसरात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये गौतम यांना कामचुकार म्हणण्यात आले होते. अशा अधिकाऱ्यांना बुटाने मारून हाकलून दिले पाहिजे, अशीही वाक्ये संबंधितांच्या तोंडी आहेत. मी अपयशी ठरल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे, असेही गौतम यांनी चिठीत लिहिले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!