“श्री विसर्जन” करण्यासाठी गेलेल्या ६ तरुणांचा बुडून मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडछल येथील तरुण शुक्रवारी दुपारी गणपती विसर्जन करण्यासाठी गावापासून जवळच असलेल्या अमरावत तलावात गेले असता याठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने सहा तरुणांचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे यंदा नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने सर्व धरण व तलावे पाण्याने शंभर टक्के भरले आहेत त्यामुळे पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मृतांमध्ये कैलास संजय चित्रकथे (वय १७), सचिन सुरेश चित्रकथे (वय१९), विशाल मंगल चित्रकथे(१७), दीपक सुरेश चित्रकथे(वय२१), रविंद्र शंकर चित्रकथे (२९), सागर बाबा चित्रकथे(२०) यांचा समावेश असून या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान मृतदेह पाण्यातून काढण्याचे काम सुरू असून प्रशासनासह पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले आहेत.