शिक्षक दिनानिमित्त राहुल गांधी यांनी मानले सोशल मीडिया आणि टीकाकारांचे आभार

शिक्षक दिनाच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्यांच्याकडून त्यांना खूप शिकायला मिळालं अशा लोकांचे आभार मानले आहेत. राहुल यांनी त्यांचे राजकीय विरोधक आणि सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ज्यांच्याकडून प्रत्येक वेळी मला काही ना काही शिकता आलं, अशा सर्वांचे शिक्षक दिनानिमित्त मी आभार मानतो, असा टोला राहुल यांनी ट्विटरवरून हाणला आहे.
मला ज्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले त्यात सोशल मीडिया ट्रोलर्स, धोरणी पत्रकार आणि माझे राजकीय विरोधक यांचा समावेश आहे. त्यांच्या द्वेषी लिखाण, खोटा प्रचार आणि रागाने मला खूप काही शिकवलं. यामुळे मी खूप सामर्थ्यवान व्यक्ती झालो आहे, असा टोला राहुल यांनी हाणला आहे.