Aurangabad : पंतप्रधानांच्या बंदोबस्तासाठी राज्यभरातून अडीच हजार पोलिस : मोक्षदा पाटील

औरंगाबाद शहर पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या औरंगाबाद दौर्यानिमित्त बंदोबस्तासाठी राज्यभरातून अडीच हजार पोलिस शहरात तैनात करण्यात आले आहेत. अशी माहिती पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली आहे.
येत्या ७ सप्टेंबर रोजी शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील आॅरिक सिटीचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.
यादौर्या दरम्यान चिकलठाणा विमानतळावर शहर पोलिसांचा बंदोबस्त तीन दिवस अगोदर लावण्यात आला असून या बंदोबस्ताचे नेतृत्व पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील करणार आहेत.
औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडे एकूण१८५० पोलिस बल आहे. एकूण ३जार ३०० पोलिस या बंदोबस्ताठी तैनात करण्यात आल्याचे पाटील म्हणाल्या