बँकेच्या वसूली अधिका-यास लुटणारे पाच दरोडेखोर गजाआड, एअरगनसह ८६ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त

औरंंंगाबाद : कर्जाचे हप्ते वसूल करून औरंगाबादकडे परतत असलेल्या दुचाकीस्वार बँकेच्या कर्मचा-यास पाच जणांनी एअरगनचा धाक दाखवून लुटल्याची घटना १ सप्टेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी ५ दरोडेखोरांच्या टोळीला गजाआड केले असून टोळीच्या ताब्याून एक एअरगन, तीन मोबाईल, एक दुचाकी असा एकूण ८६ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांनी बुधवारी (दि.४) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश उर्पâ गणेश अशोक त्रिभूवन (वय १९), लहु पांडूरंग बावस्कर (वय१८), दोघे राहणार हारेगाव, ता.श्रीरामपुर,जि.अहमदनगर, सचिन अशोक माळी (वय २७, रा.महादेव मंदिराजवळ, जोगेश्वरी, वाळुज एमआयडीसी), दगडू किसन सोनवणे (वय ३२, रा.ओव्हर जटवाडा, ह.मु. रामराई, ता.गंगापूर), राजू रूस्तम मनोरे (वय २४, रा.जोगेश्वरी, एमआयडीसी वाळुज) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर गौरव उर्फ संकेत योसेफ पंडीत (रा.हारेगाव, ता.श्रीरामपुर,जि.अहमदनगर) हा फरार असल्याचे फुंदे यांनी कळविले आहे. एम अॅण्ड पी कंपनीचे वाटप केलेले कर्जाचे हप्ते जमा करण्यासाठी धिरज नंदकिशोर जाधव (वय २४, रा.शेकटा, ता.गंगापूर) हे १ सप्टेंबर रोजी वसूलीच्या कामासाठी नरसापूर येथे गेले होते. कर्जाचे हप्ते जमा करून ते नरसापूर ते गंगापूर रोडने येत असतांना पाऊस येत असल्याने झाडाखाली थांबले होते. त्यावेळी दोन दुचाकीवर आलेल्या चार जणांनी त्यांना मारहाण करीत रोख रक्कम आणि बायामेट्रीक मशीन असा एवूâण ५४ हजार ५० रूपये किमतीची मुद्देमाल हिसकावून पोबारा केला होता.
्रयाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक संदीप सोळंके, सहाय्यक फौजदार वसंत लटपटे, जमादार रतन वारे, नवनाथ कोल्हे, बाळु पाथ्रीकर, रमेश अपसनवाड, रामेश्वर धापसे, नरेंद्र खंदारे, योगेश तरमळे, जिवन घोलप आदींनी दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या.