Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : पंजाबात फटाक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन १९ ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Advertisements
Advertisements
Spread the love

पंजाबच्या गुरूदासपूर जिल्ह्यातील बाटला येथील एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. अनेक जण जखमी झाले असून दोन इमारतीत ५० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आजुबाजुच्या परिसरातील लोकांमध्ये भीती पसरली आहे. आज दुपारी चारच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती आहे.

Advertisements

या स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहेत. त्यांच्यावर त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच दोन इमारतीत ५० जण अडकल्याची माहिती आहे. या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथक प्रयत्न करीत आहेत. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

Advertisements
Advertisements

स्फोटात अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथक प्रयत्न करीत आहे. स्फोटानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे. या धुरामुळे लोकांना बाहेर काढताना अडचण येत आहे, असे बचाव पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. दरम्यान, या कारखान्या परवानगी होती की तो अनधिकृत होता याची अद्याप माहिती समोर आली नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!