वाहतूक नियमाचा भंग : नाकापेक्षा मोती जड !! स्कुटीची किंमत १५ हजार आणि दंड २३००० !!

वाहतूक नियमांचा भंग करणं आता किती भारी पडणार आहे त्याचं एक ताजं उदाहरण समोर आलं आहे. दिल्लीच्या एका इसमाला गुरुग्राममध्ये २३ हजार रुपये दंड झाला मात्र हा दंड न भरण्याचा पवित्र वाहनस्वाराने घेतला आहे .
गंमत म्हणजे त्याच्या स्कूटीची किंमत १५ हजार आहे! दिनेश मदान असं या इसमाचं नाव आहे. मदान गीता कॉलनी भागात राहतात. त्यांना वाहतूक पोलिसांनी पकडलं, तेव्हा ते घरून गाडीची कागदपत्रं मागवत होते, पण पोलिसांनी त्यांचं काही ऐकलं नाही, असं दिनेश सांगतात.
ज्या एव्हिएटर स्कूटीवर त्यांना दंड बसला आहे, तिची किंमत १५ हजार रुपये आहे. त्यामुळे हा दंड न भरण्याच पवित्रा दिनेश यांनी घेतला आहे.