पीएम मोदी जिथे चहा विकायचे त्या दुकानाचं होतंय पर्यटन स्थळ , केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी घेतला आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधल्या वडनगर रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे. त्यांनी त्यांच्या भाषणांमध्ये याचा उल्लेख वारंवार केला आहे. आता याच दुकानाचं पर्यटनस्थळामध्ये रूपांतर होणार आहे. केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी नुकतीच वडनगरला भेट दिली.
ज्या ठिकाणी पर्यटन स्थळं विकसित करता येतील अशा ठिकाणांचा त्यांनी आढावा घेतला. प्रल्हाद पटेल यांनी वडनगर रेल्वे स्टेशनला जाऊन तिथे पर्यटन स्थळ विकसित करण्याची घोषणा केली.
एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, ही गोष्ट सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे असे सरकारचे मानणे आहे . चहा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रिय विषय आहे . आपण ” चायवाला ” आहोत असे त्यांचे कायम म्हणणे असते. २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा ” चाय पे चर्चा ” हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय झाला होता.