भाजपनेते स्वामी चिन्मयानंद स्वामी यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर त्यांच्याच महाविद्यालयातील विद्यार्थाीनीने लैंगिक शोषणाच्या केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उत्तर प्रदेश सरकारला आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने हे देखील म्हटले आहे की या एसआयटीचे नेतृत्व आयजी पदावरील अधिकारी करेल. या मुलीच्या भावाचा प्रवेश दुसऱ्या प्रवेश दुसऱ्या महाविद्यालयात करावा, कारण चिन्मयानंद यांच्या ट्रस्टच्यावतीने चालवल्या जाणाऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेण्यास त्याला भीती वाटत आहे व मुलीच्या कुटूंबीयांना देखील संरक्षण दिले जावे, असेही आदेश देण्यात आले आहेत.
संबंधित विद्यार्थीनीस शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले होते. न्यायालयाने सुरक्षेच्या कारणास्तव पोलीसांच्या सुरक्षेत तिला दिल्लीत राहण्याचे आदेश दिले होते. या विद्यार्थीनी बेपत्ता झाल्यानंतर एक व्हिडिओद्वारे चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. या आरोपांच्याआधारे २७ ऑगस्ट रोजी शाहजहांपूर पोलिसांनी चिन्मयानंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या व्हिडिओत संबंधीत मुलीने आपल्यासह आपल्या परिवारास धोका असल्याचेही म्हटले होते. तर, विद्यार्थीनीच्या वडिलांनी देखील चिन्मयानंद यांच्यावर मुलीचे लैगिंक शोषण केल्याचा व तिचे अपहरण केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. यावर चिन्मयानंद यांनी हा आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार असल्याचे म्हटले होते.