विग कमांडर अभिनंदन वर्तमान पुन्हा एकदा झाले सक्रिय, मिग २१ विमानाचे केले उड्डाण !

पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडणारे भारतीय हवाई दलातील विग कमांडर अभिनंदन वर्तमान पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. पाकिस्तानच्या तावडीतून सुटल्यानंतर अभिनंदन यांनी पठाणकोट विमानतळावर मिग-२१ विमानाचे उड्डाण केले. यावेळी त्यांच्यासोबत हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआही उपस्थित होते. आज सकाळी ११.३० वाजता अभिनंदनने मिग-२१चं टेकऑफ केलं. अर्ध्या तासाच्या उड्डाणानंतर पुन्हा पठाणकोट विमानतळावर विमानाचं लँडिंग करण्यात आलं. हे विमान मिग-२१चं ट्रेनर व्हर्जन आहे. अभिनंदन यांनी यापूर्वी पाकिस्तानचं एफ-१६ हे विमान हवेतच पाडलं होतं. यावेळी त्यांच्या विमानालाचंही मोठं नुकसान झालं होतं. त्यांचं विमान पीओकेमध्ये पडलं होतं. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतलं होतं. मात्र भारताच्या कुटनीतीमुळे पाकिस्तानला अवघ्या २४ तासांत त्यांना सोडावं लागलं होतं.