भाजपात येणारे नेते “पोरं ” नाहीत !! ते पक्ष का सोडताहेत याचा विचार करा , चंद्रकांत पाटील यांचा काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा रविवारी रात्री सोलापूरमध्ये समारोप झाला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या जाहीर सभेत भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठा खुलासा केलाय. ते म्हणाले, आमच्यावर टीका केली जाते की आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची पोरं पळवतो म्हणून. पण प्रवेश करणारे हे काही लहान मुलं नाहीत. अनेक मोठे नेते प्रवेश करताहेत. उदयनराजे, धनंजय महाडीक हे भाजपमध्ये प्रवेश करताहेत, करणार आहेत ही सगळी मंडळी समजदार आहेत. ते का असा निर्णय घेत आहेत याचा त्यांनीच विचार करावा असा टोही त्यांनी लगावला.
या सभेत काँग्रेसचे मान खटावचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे उस्मानाबादचे आमदार राणाजगजीतसिंह पाटिल आणि राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.