आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीला विरोधी पक्ष देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाचे काम करावे : पृथ्वीराज चव्हाण

मुख्यमंत्र्यांनी, आगामी विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचाच विरोधी पक्ष नेता असेल असे वक्तव्य केल्यानंतर त्यावर आपले उत्तर देताना , त्यांनी आता ज्योतिषाचे काम करावे असा खोचक सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर हि तोफ डागली.
यावेळी बोलताना त्यांनी आरोप केला कि , देशभरात जे विरोधक भाजपात येणार नाही त्यांच्याविरोधात चौकशी लावली जाते आहे. चौकशी लावू अशी धमकीही त्यांना दिली जाते आहे. फक्त राष्ट्रवादीच्याच नेत्यांना नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनाही अशाचप्रकारे धमक्या देऊन भाजपात घेतले जाते आहे.
आघाडी सरकारच्या काळात देखील किरकोळ घोटाळे होत होते. त्यावेळी घोटाळेबाजावर कारवाई केली. पण यांच्या कार्यकाळात तर लाखो कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे. तसेच अनेक भागांत घोटाळ्यांची प्रकरणं पुढे येत आहे. त्यावर हे सरकार कोणत्याही प्रकारची संबधितावर कारवाई केली जात नाही. आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही बॅंकाचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून काय साध्य होणार हे अद्याप पर्यंत योग्य स्पष्टीकरण सरकारकडून दिले गेले नाही असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.