भगतसिंग कोश्यारी : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री यांची महाराष्ट्राच्या पदावर नियुक्ती करण्यता आली आहे. सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ ३० ऑगस्ट २०१९ रोजी संपला, त्यांच्या जागी भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली.
भगत सिंह कोश्यारी उत्तराखंडचे दिग्गज भाजप नेते आहेत. त्यांचा जन्म १७ जून १९४२ रोजी झाला होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांनी १९७७ मध्ये आणीबाणीच्या वेळी तुरुंगवासही भोगला आहे. उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली तेव्हा ते भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष बनले. २००१ ते २००७ या कालावधीत ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. २००२ ते २००७ पर्यंत त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणूनही काम पाहिलं. २००८ ते २०१४ पर्यंत ते राज्यसभेत खासदार होते. त्यांनी इंग्रजी साहित्यातून पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. ते शिक्षक आणि पत्रकारही होते. १९७५ मध्ये पिथोरागडहून प्रकाशित होणाऱ्या ‘पर्वत पीयूष’ साप्ताहिकाचे ते संस्थापक तसेच प्रबंध संपादक होते.
महाराष्ट्रासह एकूण पाच राज्यांना नवे राज्यपाल मिळाले आहेत. केरळला आरिफ मोहम्मद खान यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वी काँग्रेसमध्ये असणारे आरिफ खान खूप काळ राजकारणापासून दूर होते. आरिफ मोहम्मद खान यांच्यासह कलराज मिश्र – राजस्थान, बंडारू दत्तात्रेय – हिमाचल प्रदेश, तमिलीसाई सुंदरराजन – तेलंगणा असे नवे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत.