Aurangabad : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेला अलर्ट, दंगलींचा इतिहास आणि वाढती गुन्हेगारी पाहता यंदा कुठलेही विघ्न येऊ नये, त्यासाठी शहर पोलिस सज्ज झाले आहेत. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्रीय राखीव पोलिस दल, राज्य राखीव पोलिस दलासह अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याशिवाय साडेचारशे अधिकारी, कर्मचा-यांचे फिक्स पॉईंट सोमवारपासून लावले जाणार आहेत. तर एक अधिकारी आणि तीन कर्मचारी असलेली २९ पथके शहरात पायी गस्त घालणार आहेत.
श्री गणेशाच्या स्वागतासाठी गणेश भक्तांसोबतच पोलिस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. गणेशोत्सवात उत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांचे १०५ पथक नेण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे, डॉ. राहुल खाडे, मीना मकवाना, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे आणि सर्व ठाणेदार यांची बंदोबस्तावर विशेष नजर राहणार आहे.
….
फिक्स पॉईंट – ३७० कर्मचारी
विशेष फिक्स पॉईंट – १४ (एक अधिकारी, ५६ कर्मचारी)
टास्क फोर्स – १० (एक अधिकारी, ५० कर्मचारी)
स्ट्रायकिंग फोर्स – ५ उपनिरीक्षक, ५० कर्मचारी
पायी गस्त – २९ पथके (एक अधिकारी, तीन कर्मचारी)
…..
असा राहिल बंदोबस्त
शहरात तीन पोलिस उपायुक्त, पाच सहायक पोलिस आयुक्त, २९ निरीक्षक, ७३ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, एक हजार ५४५ शिपाई, १२८ महिला शिपाई यांच्यासह राज्य राखीव पोलिस दल आणि राज्य राखीव पोलिस दलाची प्रत्येकी एक कंपनी (शंभर जवान) बंदोबस्तावर राहतील. याशिवाय एक सहायक पोलिस आयुक्त, तीन निरीक्षक, पाच सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, ६० पोलिस कर्मचारी आणि १० महिला कर्मचारी राखीव असणार आहेत.