#MumbaiGangRape : बलात्कारातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे औरंगाबादेतही आंदोलन

चुनाभट्टी येथे अत्याचार झालेल्या पीडित मुलीच्या निधना नंतर आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर काळी पट्टी बांधुन शांती आणि अहिंसे च्या मार्गाने मुक आंदोलन करण्यात आले व नंतर मा पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना निवेदन दिले.
या आंदोलनात विजय साळवे (शहर अध्यक्ष) छाया जंगले पाटील( महिला जिल्हाध्यक्ष), विणा खरे, महराज पटेल (शहर अध्यक्ष) प्रतिभा वैद्य (कार्याध्यक्ष) मंजुषा पवार रेखा राऊत अयुब खान वाहुल ताई सरताज खान शकिला बाजी, वंदना ताई, अश्फाक कुरेशी, सलीम भाई आदींचा सहभाग होता.
दरम्यान मुंबईतही राष्ट्रवादीच्या नेत्या खा . सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालीही आंदोलन करण्यात आले. या प्रकरणातील चौकशीच्या मागणीसाठी शासनाने एसआयटी स्थापन करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याशिवाय औरंगाबादेतील घाटी रुग्णालयातील पीडित तरुणीचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.