गणपती मंडळांनी सांगली-कोल्हापूर पुरग्रस्तांना मदत करावी – माजी खा. खैरे

गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करन्याचे आवाहन
औरंंंगाबाद : गणेशोत्सव काळात शहरातील गणेश मंडळांनी कोणतेही भव्य-दिव्य कार्यक्रम न ठेवता सातारा, सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्यातील पुरग्रस्तांना भरीव मदत करावी असे आवाहन शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुरूवारी (दि.२९) केले. आगामी गणेशोत्सव आणि मोहर्रम सणाच्या पाश्र्वभूमीवर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना माजी खासदार खैरे बोलत होते. दरम्यान, गणेशोत्सव आणि मोहर्रम हे दोन्ही सण शांततेत आणि उत्साहात साजरे करावे असे आवाहन यावेळी उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांनी केले.
आगामी गणेशोत्सव आणि मोहर्रम सणाच्या पाश्र्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने तापडीया नाट्य मंदीर येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह महापौर नंदकुमार घोडेले, आ.संजय शिरसाट, शिवसेनेचे महानगर प्रमुख माजी आ. प्रदीप जैस्वाल, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त मीना मकवाना, निकेश खाटमोडे, गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, गणेश महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र जंजाळ, सिडको-हडको गणेश महासंघाचे अध्यक्ष अक्षय पोलकर, नवीन औरंगाबाद गणेश महासंघाचे बबन डिडोरे, छावणी गणेश महासंघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, नगरसेवक माधुरी देशमुख-अदवंत, गजानन बारवाल, अनिल मकरीये,मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे, नवीन ओबेरॉय, माजी महापौर रशीद मामू आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. बैठकीच्या प्रारंभी गणेश मुर्तीची आराधना करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
पुढे बोलतांना माजी खा. खैरे म्हणाले की, गेल्यावर्षी विविध गणेश मंडळाच्या पदाधिकाNयांवर दाखल झालेले गुन्हे पोलिसांनी रद्द करावेत. तसेच रात्री उशिरापर्यंत निरालाबाजार, वॅâनॉट प्लेस, बुढ्ढीलेन, रोशनगेट भागात फिरणाNयावर तात्काळ कारवाई करावी, तसेच रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारी दुकाने बंद करण्यासाठी पोलिसांनी उपाय योजना कराव्यात असे ते त्यावेळी म्हणाले.
आपल्या भाषणात महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले की, गणेशोत्सव काळात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी मनपाच्या वतीने शहरात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. तसेच गणेश विसर्जन मिरवणूकीच्या मार्गावरील खड्डे बुजविण्यात येतील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आपल्या भाषणात आमदार संजय शिरसाट म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर गणेशोत्सव यंदा जल्लोषात साजरा केला जाणार आहे. परंतु या जल्लोषाचा अतिरेक होणार नाही याची ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली. तसेच पोलिसांचा धाक नागरीकावर असलाच पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले की, गणेश मंडळांनी देखावे तयार करीत असतांना कोणत्याही जाती-धर्मावर टिका करणारे देखावे तयार करू नयेत, वाढते ध्वनीप्रदुषण आणि वायु प्रदुषण टाळण्यासाठी गणेश मंडळांनी डीजे साऊंड सिस्टीम ऐवजी पारंपारीक वाद्य असलेले ढोल-ताशे, बॅण्ड, लेझीम आदीचा वापर करावा. गणेश मंडळांनी गणपती मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) ची मुर्ती वापरण्याऐवजी शाडू मुर्तीची प्रतिष्ठापना करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शांतता समितीच्या बैठकीत आ.संजय शिरसाट, शिवसेनेचे महानगर प्रमुख माजी आ. प्रदीप जैस्वाल, गणेश महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र जंजाळ, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, नगरसेवक माधुरी देशमुख-अदवंत, गजानन बारवाल, माजी महापौर रशीद मामू यांनी देखील आपले मनोगत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक उपायुक्त मीना मकवाना यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.नागनाथ कोडे यांनी मानले.
२०१८ सालचे पारितोषीक विजेते गणेश मंडळे
शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने २०१८ साली घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील विजेत्या गणेश मंडळांना पारितोषीक देवून गौरविण्यात आले. त्यात ओमशांती गणेश मंडळ, अनिरूध्द क्रीडा मंडळ, दोन्ही छावणी, मराठी वादक प्रतिष्ठान (सिडको एन-७), चक्रव्युह क्रीडा मंडळ (गोकुळवाडी), गोगानाथ क्रीडा मंडळ (बेगमपुरा), संगम नवयुवक क्रीडा मंडळ, ओम मृत्यूंजय क्रीडा मंडळ (बेगमपुरा), स्वतंत्र गणेश मंडळ, सिध्दीविनायक गणेश मंडळ, सावता गणेश मंडळ, जय मल्हार गणेश मंडळ, सर्व चिकलठाणा, आदर्श गणेश मंडळ (वैâलासनगर), यादगार गणेश मंडळ (जाधवमंडी), नवसार्वजनिक गणेश मंडळ (शहागंज), न्यु शक्ती गणेश मंडळ (खडकेश्वर), सदभावना गणेश मंडळ (पुंडलिकनगर), देवडीचा राजा गणेश मंडळ (नवाबपुरा), शिवस्वराज्य प्रतिष्ठान (नागेश्वरवाडी) आदींचा समावेश आहे