महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला इंदापूरमधील बळपुडी गावाजवळ अपघात झाला आहे. या अपघातातून शिंदे थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या पायाला मार लागला आहे. मात्र, त्याचा चालक गंभीर जखमी झाला आहे. शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष निवडणूक लढविण्याची तयारी करतोय. त्या निमित्तानं ते सोलापूरमधील आपल्या गावी निघाले होते. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास शिंदे यांची कार एका डंपरला मागून जाऊन धडकली. त्यात ते किरकोळ जखमी झाले. अपघातात त्यांचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शिंदे आता पुण्याकडं रवाना झाले होते. या अपघातात शिंदे यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.