Aurangabad Crime : कुख्यात घरफोड्या गुन्हे शाखेच्या जाळ्यात

औरंंंगाबाद : कुख्यात घरफोड्या व लुटमारी करणारा गुन्हेगार संजय उर्फ पप्पू अण्णासाहेब पवार (वय २६, रा. विश्रांतीनगर, गल्ली क्र. ६, मुकुंदवाडी) याला मुकुंदवाडी परिसरातील झेंडा चौकातून गुन्हे शाखा पोलिसांनी १७ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अटक केली. अटकेत असलेल्या संजय उर्पâ पप्पू पवार याच्याकडून घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी रविवारी (दि.१८) व्यक्त केली आहे.
संजय उर्फ पप्पू पवार याने १५ जून रोजी रात्री जयभवानीनगरातील गल्ली क्र. १२ मध्ये घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल असा ४२ हजार सातशे रुपयांचा ऐवज लांबविल्याची कबुली दिली. तसेच ३० जुलै रोजी दोन साथीदारांच्या मदतीने पुण्याच्या देहुरोडवर एकाच रात्री पाच दुकानांचे शटर फोडून मोबाईल चोरी केल्याचे देखील सांगितले. तर त्याच्याविरुध्द करमाड पोलिस ठाण्यात शस्त्र बाळगल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली.
गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय पवार, सहाय्यक फौजदार विठ्ठल जवखेडे, जमादार विजय पिंपळे, संदीप सानप,नितीन देशमुख, पवार, शेख बाबर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.