Bihar : आमदारांच्या घरात सापडली एके ४७ , आमदार म्हणतात ती माझी नव्हेच !!

बिहारमधील मोकामा मतदारसंघातील अपक्ष यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत पोलिसांना एके-४७ रायफल सापडली आहे. आमदाराच्या घरांची पोलिसांकडून कसून तपासणी सुरू आहे.
पटणा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी या छापेमारीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आमदाराच्या घराची झाडाझडती घेतली त्यावेळी पोलिसांना एके-४७ सापडली आहे. तसेच घरात बॉम्ब मिळाल्याचीही चर्चा आहे. पटणा पोलिसांनी त्यामुळे बॉम्बनिरोधक पथकांना बोलावले होते, अशी चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी सकाळी मोकामाचे अपक्ष आमदार अनंत सिंह यांच्या घरावर पोलिसांची छापा मारला आहे. पोलिसांनी ही छापेमारी आमदाराच्या लदमा गावातील घरावर केली. विशेष म्हणजे, अनंत सिंह यांच्या पत्नी नीलम देवी यांनी मुंगेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
ज्या घरी मी गेल्या १४ वर्षापासून गेलो नाही. जे घर बंद आहे. जेथे मी गेलोच नाही. त्या ठिकाणी एके-४७ रायफल आली कुठून?, हे सर्व मला अडकवण्यासाठी केले जात आहे, असा आरोप आमदार अनंत सिंह यांनी वृत्तवाहिनींशी बोलताना केला आहे.