अरुण जेटली यांच्यावर उपचार सुरू असलेल्या एम्स रुग्णालयात आग

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यावर उपचार सुरू असलेल्या दिल्लीतल्या एम्स रुग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, या आगीत अद्याप कुणालाही इजा झाल्याचं किंवा जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. आग का लागली, याचं कारण अद्याप अस्पष्ट असलं, तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ANI
@ANI
Delhi: A fire has broken out on first and second floor at All India Institute of Medical Sciences (AIIMS). Fire brigade present at the spot