Current news updates : भाजप नेते अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक

माजी अर्थमंत्री अरुण जेटलींची प्रकृती अत्यंत नाजूक असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एम्स रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आहे. प्रकृती खालवल्यामुळे ९ ऑगस्ट रोजी जेटलींना आयसीयूमध्ये भर्ती करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपतील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे.
गेल्या काही काळापासून अरुण जेटलींची तब्येत खालावली होती. फुफ्फुसांमध्ये पाणी भरल्यामुळे ९ ऑगस्टला सकाळी त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलं. जेटलींची प्रकृती गंभीर असल्याचं एम्सने ९ तारखेला संध्याकाळी जाहीर केलं होतं. त्यानंतर जेटलींच्या तब्येतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती एम्सकडून देण्यात आलेली नाही.
जेटलींच्या फुफ्फुसांमध्ये सतत पाणी साठत असल्यामुळे डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या जेटलींचे रुधिराभिसरण सुरळीतपणे सुरू आहे. राष्ट्रपतींनी जेटलींना भेटून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे.
सहा महिन्यांपूर्वी जेटलींना कर्करोग झाल्याचेही निदान झालं होतं. त्यानंतर अमेरिकेत त्यांच्यांवर उपचार करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांची किडनीही ट्रान्सप्लान्ट करण्यात आली आहे. लठ्ठपणामुळे जेटलींनी बॅरिएटीक सर्जरीही केली होती.