Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे निधन

Advertisements
Advertisements
Spread the love

ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं. त्या ७२ वर्षांच्या होत्या. हृदय व फुफ्फुसाच्या विकारानं त्रस्त असलेल्या सिन्हा यांच्यावर जुहू येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Advertisements

‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘पती, पत्नी और वो’, ‘सबूत’ अशा गाजलेल्या चित्रपटात झळकलेल्या विद्या सिन्हा यांची मनोरंजनसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. काव्यांजली, कुल्फी कुमार बाजेवाला, भाभी, बहुरानी, कबूल है, चंद्र नंदिनी या टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केलं होतं. ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ मालिकेतील त्यांची बेबे ही भूमिका विशेष गाजली होती. मधल्या काळात त्या बॉलिवूडपासून दूर होत्या. बऱ्याच वर्षांनी त्या सलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटात दिसल्या होत्या.

Advertisements
Advertisements

मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. हृदयाचा आजार बळावल्यानं डॉक्टरांनी त्यांना अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी अँजिओप्लास्टी करण्यास नकार दिला होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!