Viral Video : फेकाफेकी : पूल कोसळतानाचा ” तो ” व्हिडीओ भीमा नदीवरचा नाहीच … मग कुठला आहे ?

व्हायरल व्हिडिओ
सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टाकळी येथे भीमा नदीवरील पूल महापुरात वाहून गेल्याची चर्चा सुरु झाली आणि प्रशासनासह नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अचानक सुरु झालेल्या या चर्चेने प्रशासन तर हबकूनच गेले. त्यामुळे प्रशासन आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनी खरी स्थिती जाणून घेण्यासाठी पुलाकडे धाव घेतली. तर, पूल जैसे थे स्थितीत होता. पुलाला काहीच झाले नव्हेत. त्यावरील वाहतूकही सुरळीत सुरु होती. मग ही चर्चा अचानक सुरु झालीच कशी? अपवांना पेव फुटलेच कसे? याबाबत उत्सुकता निर्माण झाली. या उत्सुकतेतून समोर आला खरा प्रकार. ही अफवा एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे निर्माण झाली होती.
तो व्हिडिओ आणि पूल कोसळल्याची चर्चा याबाबत जाणून घ्या सत्य. अर्थाच फॅक्ट चेक (Fact Check).
सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन मोठे पूल आहेत. ही वस्तुस्तीती आहे. दोन्हीपैकी एक एक वडगबाळ येथे सीना नदीवर, दुसरा टाकळी येथे भीमा नदीवर आहे. व्हायरल व्हिडिओत जो पूल कोसळ्याची घटना दिसते आहे की, याच पूलावर घडल्याचा दावा केला जात आहे पण तो खोटा आहे.
अर्थात, टाकळी येथे भीमा नदीवर असलेल्या पुलाचे काही वर्षांपूर्वी अस्तर निघाले होते ही गोष्ट खरी आहे. पण, प्रशासनाने त्याची वेळीच डागडूजी केली होती. त्यामुळे तो पूल आजही उभा आहे. दरम्यान, व्हिडिओत जो पूल कोसळताना दिसतो आहे. तो भलत्याच ठिकाणचा आहे. व्हिडिओतील हा पूल सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुळीच नाही.
दरम्यान, आघाडीचे इंग्रजी दैनिक टाईम्स ऑफ इंडियाने 15 ऑगस्ट 2017 रोजी दिलेल्या वृत्तानुसार, बिहार राज्यातील कटीहार येथील महानंदा नदीवरील पूल कोसळला होता. हा पूल कोसळतानाचा व्हिडिओ टीओआयच्या युट्युबवर चॅनलवर आजही उपलब्ध आहे. काही खोडसाळ मंडळींनी सोलापूर-विजापूर महारामार्गावली भीमा नदिवर असलेला टाकळी पूल कोसळला नावाने अफवा पसरवत नेमका हाच व्हिडिओ व्हायरल केला असवा अशी शक्यता आता वर्तवली जात आहे.
मूळ व्हिडिओ
https://youtu.be/uyO5b5Ua8Lw