गर्जा महाराष्ट्र माझा : महाराष्ट्रातील ४६ पोलिसांना राष्ट्रपती पदक, Aurangabad चे पोलीस उपनिरीक्षक गोरख चव्हाण यांचाही समावेश

स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण ४६ पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत. त्यातील पाच जणांना विशेष सेवेसाठी, तर ४१ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पाच अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकानं गौरवण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापुरातील करवीर विभागातील पोलीस उपअधीक्षक राजाराम पाटील, मुंबईतील साकिनाका विभागातील सहायक पोलीस आयुक्त मिलिंद भिकाजी खेटले, पुण्यातील एसआरपीएफचे असिस्टंड कमांडंट हरिश्चंद्र काळे आणि कोल्हापूर जिल्हा विशेष शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक मारुती कलप्पा सूर्यवंशी यांना (विशेष सेवा) राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. रामचंद्र जाधव यांना हे तिसरे राष्ट्रपती पदक मिळाले आहे. तर राजाराम पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे. होमगार्ड, नागरी सेवा आणि अग्निशमन विभागात महाराष्ट्राला एकही पदक मिळाले नाही.
राष्ट्रपती पोलीस पदक विजेत्यां मध्ये सुरेश कुमार मेंगडे, पोलीस अधीक्षक ठाणे, विक्रम देशमाने, उपायुक्त मुंबई, दिलीप बोरसाटे, उपायुक्त, एसीबी पुणे, नेताजी भोपळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबई, मुकुंद हातोटे, सहाय्यक पोलीस आयुक्त, ठाणे, किरण पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबई, अविनाश धर्माधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबई, श्रीमती गोपिका जहागीरदार, उपायुक्त, मुंबई, मंदार धर्माधिकारी, उपायुक्त, पालघर, राजेंद्र कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे, सय्यद साबिर अली, पोलीस निरीक्षक, बीड, सतिश गायकवाड, पोलीस निरीक्षक, नवी मुंबई, बालाजी सोनटक्के, पोलीस निरीक्षक, चिंचवड, रवींद्र बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सीआयडी, पुणे, अब्दुल रउफ गणी शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मुंबई, रमेश खंडागळे, नागपूर, प्रकाश कदम, मुंबई , किशोर यादव, पोलीस उपनिरीक्षक, पुणे, राजेंद्र पोळ, पोलीस उपनिरीक्षक, पुणे, नानासाहेब मसाला, सोलापूर, रघुनाथ भरसाट, नाशिक ग्रामीण, केशवराव टेकाडे, अमरावती, रामराव राठोड, जालना, दत्तात्रय उगलमुगले, नाशिक ग्रामीण, मनोहर चिंतल्लू, पुणे , कचरू चव्हाण, अमरावती, दत्तात्रय जगताप, पुणे ग्रामीण, अशोक तिडके, नागपूर, विश्वास ठाकरे, नागपूर, सुनील हरणखेडे, यवतमाळ, गोरख चव्हाण, औरंगाबाद, अविनाश मराठे, पुणे, खामराव वानखेडे, नांदेड, नितीन शिवलकर, नागपूर, प्रभाकर पवार, मुंबई, अंकुश राठोड, जालना , बाळू भोई, पुणे, श्रीरंग सावर्दे, मुंबई, अविनाश सातपुते, नांदेड, मकसूद पठाण, परभणी , गणेश गोरेगावकर , मुंबई. आदींचा समावेश आहे.