Independence Day 2019 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 73 व्या स्वातंत्र्य दिनाचे भाषण कुठे पाहाल ?

Excited that @ddnational coverage of Independence Day Speech of Hon’ble @PMOIndia from Red Fort will be carried prominently by Google on its Search Page making it digitally accessible to audiences across the world.
— Shashi Shekhar Vempati शशि शेखर (@shashidigital) August 13, 2019
आता तुम्ही कुठेही असलात तरी गुगलच्या साहाय्याने तुम्हाला लाल किल्ल्याच्या प्रांगणात होणारा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण पाहता येईल. या सोहळ्याची इत्यंभूत माहिती आपल्या पर्यंत पोहोचावी आणि हा सोहळा Live पाहता यावा यासाठी दूरदर्शन वाहिनीने विशेष पाऊल उचचले आहे.
मोदींचे लाइव्ह भाषण पाहण्यासाठी दूरदर्शनच्या युट्यूब पेजला भेट द्या. तसेच जर गुगल वर ‘India Independence Day’ असे शोधलात तर तुम्हाला हे भाषण मोबाईलवर तसेच डेस्कटॉपवरही पाहता येईल.
मिंटच्या बातमीनुसार, गुगलने राष्ट्राचे महत्व लोकापर्यंत पोहाचावे म्हणून प्रसार भारती शी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिन, मतदान दिनाचा लेखाजोगा आपण अगदी सहजपणे गुगलवर पाहू शकतो.
प्रसार भारती चे संचालक शशी शेखर यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे, की ‘भारताच्या पंतप्रधानांचे भाषण दूरदर्शनच्या माध्यमातून आता गुगलवर देखील सर्च केले जाणार आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असून आम्ही यासाठी खूपच उत्साही आहोत. यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही असले, तरीही हा सोहळा पाहता येईल असेही ते पुढे म्हणाले. हे सर्व करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे प्रसार भारतीचे कटेंट आणि राष्ट्रीय सणांचे माहिती त्याचे महत्व हे जागतिक स्तरावर लोकांपर्यंत पोहोचले जाईल. ज्याचा फायदा हा भारताला ही होऊ शकतो आणि भारतीय सणांची ख्याती सा-या जगभरात पोहोचेल.