Aurangabad : विविध भागातून दुचाकी चोरणारे दोघे गजाआड पोलिसांनी केल्या १७ दुचाकी जप्त

औरंंंगाबाद : शहरासह नगर आणि ग्रामीण भागातून दुचाकी चोरून त्याची विक्री करणा-या दोन जणांना पुंडलिकनगर पोलिसांनी गजाआड केले. दुचाकी चोरट्यांच्या ताब्यातून पोलिसांनी ८ लाख ३० हजार रूपये विंâमतीच्या १७ दुचाकी जप्त केल्या असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी सोमवारी (दि.१२) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज संतोष अराध्ये (वय २२, रा.सोनारी, ता.कोपरगांव, जि.अहमदनगर), शेख गणी शेख सुभान (वय ३५, रा.परसोडा, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) अशी दुचाकी चोरून विक्री करणाNयांची नावे आहेत. महिनाभरापुर्वी देवळाई चौकातून चोरी गेलेल्या एटीएम मशिनचा शोध घेत असतांना मनोज अराध्ये हा दुचाकी चोरून शेख गणी याच्या मदतीने विकत असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, जमादार रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, प्रविण मुळे, जालींदर मांन्टे, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ, निलेश जाधव, दिपक जाधव, विशेष पोलिस अधिकारी शिवाजी बुट्टे, संतोष बोधक, वैâलास मते, श्रीमंतराव गोर्डे पाटील आदींनी मनोज अराध्ये व शेख गणी यांना लासूर स्टेशन येथून अटक केली.
पोलिस चौकशी दरम्यान मनोज अराध्ये व शेख गणी यांनी औरंगाबादसह वैजापूर, शिर्डी, संगमनेर, सिन्नर, आळे फाटा आदी ठिकाणाहुन विविध नामांकीत वंâपन्याच्या ८ लाख ३० हजार रूपये विंâमतीच्या चोरलेल्या १७ दुचाकी पोलिसांना काढुन दिल्या. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहाय्यक आयुक्त रामचंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुंडलिकनगर पोलिसांनी ही कारवाई केली.