वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची पूरग्रस्तांना भेट, नागरिकांना मदतीचे आवाहन

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी आज पूरग्रस्त भागाची पाहणी केली. आणि सांगली या भागातील पाणी ओसरण्यास काही दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता असून संसारोपयगी वस्तूंची मदत करण्याचे आवाहन आंबेडकर यांनी केले.
सध्या कोल्हापुरसह अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पुढील तीन दिवस तरी पाणी पूर्णपणे ओसरणार नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले. पुढील तीन दिवसांत पूरग्रस्त नागरिकांना संसार उपयोगी वस्तू, भांडी, शालेय साहित्य, तांदूळ, डाळी, मसाला, तेल, बिस्कीट, ब्लँकेट, महिलांचे कपडे, लहान मुलांचे कपडे, सँनिटरी नँपकिन, ग्लोज, एनर्जी ड्रिंक आदी गोष्टींची गरज लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संसार उपयोगी वस्तूंची निकड भासत असल्याने ती पुरविणे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद करत महाराष्ट्रातील सर्व सामाजिक संस्था, वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्यांनी पूरग्रस्तांना संकटातून सावरण्यासाठी मदत उभारण्याचे आवाहन केले आहे. वचिंत बहुजन आघाडीच्यावतीने मुंबई, कोल्हापूर, सांगली येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संकलन केंद्र उभारले असल्याचे प्रकाश आंबडेकर यांनी सांगितले.