Aurangabad : गुन्हे शाखेकडून ३१लाखांची चोरी उघडकीस, ५ अटकेत

गुन्हेशाखेकडून ३१लाखांची चोरी उघडकीस, ५अटके
औरंगाबाद – वाळूज औद्योगिक परिसरातील इंड्यूरन्स कंपनीतून गेल्या १० दिवसांपूर्वी ३१लाख ६७ हजारांचा मुद्देमाल चोरणार्या ५ चोरट्यांना गुन्हेशाखेने जेरबंद करुन वाळूज एम.आय.डी.सी. पोलिसांच्या हवाली केले. चोरट्यांकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला टेम्पो जप्त करण्यात आला.
या गुन्ह्यात असलम बाबू पठाण(३०),शेख अल्लाउद्दीन उर्फ हारुण शेख,(२०)शेख रशीद शेख हबीब(३४)शेख हारुण शेख हबीब(३८),जुबेर हबीब शे(१८) सर्व रा भारतनगर या आरोपींचा सहभाग होता. त्यांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या २६ते ३१ जुलै दरम्यान हा गुन्हा घडला होता. इंड्यूरंस कंपनी व्यवस्थापनाने या गुन्ह्याची शहानिशा करुन ७आॅगस्टला एम.वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता.चोरट्यांनी कंपनीच्या गोडावून परिसराची कंपाऊंड वाॅलची तार तोडून स्पेअर पार्ट, केबल वायर डिस्क,ब्रेकवायर असे एकूण ३१ लाख ६६ हजार ८८७ रु.चा मुद्देमाल चोरुन नेला होता.पीएसआय योगेश धोंडे यांना खबर्याकडून शनिवारी माहिती मिळाली की, भारतनगरातील पानटपरी चालक असलम ने आपल्या साथीदारांना सोबत घेऊन वरील चोरी केली आहे. त्यानुसार पीएसआय धोंडे यांनी भारतनगरात असलम ला ताब्यात घेत गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
वरील कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय योगेश धोंडे, पोलिस कर्मचारी सय्यद मुजीब, गजानन मांटे, भावसिंग चव्हाण, आनंद वाव्हूळ, नितीन देशमुख यांनी पार पाडली.