Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UAPA : दहशतवादविरोधी दुरुस्ती कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

Spread the love

एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करण्याचे अधिकार देणाऱ्या बेकायदा कारवाई प्रतिबंध दुरुस्ती विधेयका (यूएपीए) ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी रात्री उशिरा मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. लोकसभेमध्ये २४ जुलै रोजी तर, राज्यसभेमध्ये २ ऑगस्ट रोजी या विधेयकाला मंजुरी मिळाली होती. लष्कर-ए-तय्यबाचा संस्थापक हाफिज सईद आणि जैश-ए-महंमदचा म्होरक्या मसूद अजहरला या दुरुस्ती विधेयकान्वये दहशतवादी घोषित केले जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास या विधेयकाद्वारे दहशतवादी म्हणून घोषित झालेले ते पहिले दोन दहशतवादी ठरतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दुरुस्ती विधेयकानुसार एखाद्या व्यक्तीला दहशतवादी संशयावरून दहशतवादी ठरवल्यानंतर अशा व्यक्तीची संपत्ती सरकारला जप्त करता येणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!