Aurangabad : बकरी ईद-स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरात पोलिसांचा कडकोट बंदोबस्त

संशयीत वाहनांची तपासणी सुरु
औरंंंगाबाद : येत्या सोमवारी मुस्लिम समाज बांधवाचा बकरी ईद हा सण येत असून त्या पाठोपाठ दोन दिवसांनी भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा होणार असल्याने शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती विशेष शाखेचे निरीक्षक संतोष पाटील यांनी शनिवारी (दि.१०) दिली. दरम्यान, लागोपाठ येणा-या सण-उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर शहरात येणा-या व शहराबाहेर जाणा-या संशयीत वाहनांची नाकाबंदी करुन कसून तपासणी करण्यात येत असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
मुस्लिम समाजबांधवांचा बकरी ईद हा सण सोमवारी (दि.१२) मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. बकरी ईद सणानिमित्त मुस्लिम समाजबांधव कुर्बानी देत असतात. त्यामुळे शहरात महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सिल्लेखाना, छावणी, शहागंज, रोजाबाग, गारखेडा परिसरात तात्पूरते कत्तलखाने उभारण्यात येणार आहेत. बकरी ईद निमित्त छावणीतील ईदगाह येथे विशेष नमाज अदा केली जाणार आहे. छावणीतील ईदगाहसह उस्मानपुरा, रोजाबाग, जामा मस्जिद येथेही विशेष नमाज अदा केली जाणार आहे. या निमित्ताने शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विविध भागात पोलिसांचे फिक्स पॉर्इंट लावण्यात आले आहेत.
दरम्यान, शहराच्या विविध भागात नाकाबंदी करुन तसेच शहराच्या बाहेर जाणा-या प्रमुख रस्त्यांवर चेकपोस्ट उभारुन संशयीत वाहनांची तपासणी करण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले. तसेच शहरात विविध पोलिस ठाण्याच्या कर्मचाNयांची गस्त आणि विशेष शाखा, गुन्हे शाखा पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.