Aurangabad : गणेश मंडळांनी पूरग्रस्तांना मदत करावी – राज्यमंत्री अतूल सावे

नवीन औरंगाबाद गणेश महासंघाचे पारितोषीक वितरण समारंभ
औरंंंगाबाद : राज्यात सर्वत्र जोरदार पावसामुळे पूर परिस्थीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शहरातील गणेश मंडळांनी गणेशोत्सवावर होणारा अतिरीक्त खर्च करण्यापेक्षा पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन, उद्योग राज्यमंत्री अतूल सावे यांनी केले. नवीन औरंगाबाद गणेश महासंघाच्या वतीने गारखेडा परिसरातील गजानन नगरात शनिवारी (दि.१०) झालेल्या बक्षीस वितरण समारंभात राज्यमंत्री सावे बोलत होते.
गारखेडा परिसरातील गजानन नगर येथे झालेल्या बक्षीस वितरण समारंभास महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेवक राजू वैद्य, नवीन औरंगाबाद गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष बबनराव डिडोरे, नामदेव पवार, राजाराम मोरे, भाऊसाहेब जगताप, पंजाबराव तौर, प्रतिक पायमोडे, उध्दव सावरे, बाळूशेट जैन, विशाल डिडोरे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना राज्यमंत्री सावे म्हणाले की, पूर्वी शहरात एकच महासंघ होता, शहराचा विकास जसजसा झाला तसतशी गणेश मंडळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. गणेश मंडळांनी सामाजिक भावनेतून मदत केली पाहीजे. पूरग्रस्त बांधवांना सर्वांनी मदत केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी सन २०१८ मधील विजेत्या गेण मंडळांना बक्षीस देऊन त्यांचे कौतूक करण्यात आले. तसेच पूरग्रस्तांना मदत करु असे आश्वासन नामदेव पवार यांनी यावेळी दिले. यावैही सजीव देखाव्यामध्ये सोशल मिडियावर आधारीत देखावा तयार केलेल्या राजयोध्दा गणेश मंडळाला प्रथम क्रमांकाचे पारितोषीक देण्यात आले. याशिवाय सिध्दीविनायक गणेश मंडळाला सजीव देखाव्यासाठी तृतीय तर ओम साई गण्ोश मंडळाला झांझ पथकासाठी द्वितीय क्रमांकाचे पारितोषीक देवून गौरविण्यात आले. तसेच ढोलपथकामध्ये जिजामाता गणेश मंडळाला प्रथम तर लेझिमसाठी सिध्दीविनायक गणेश मंडळाला प्रथम क्रमांकाचे पारितोषीक देण्यात आले.
मोरया प्रतिष्ठानला ढोलपथकासाठी द्वितीय पारितोषीक देण्यात आले. शांतीबन प्रतिष्ठान (ढोलपथक), भगतसिंग गणेश मंडळ (भव्य मुर्ती), गजानन महाराज मित्र मंडळ (अन्नदाते), ब्रिलियंट किडस स्कूल (बेटी बचाव सामाजिक संदेश), जय भवानी विद्यामंदीर, छत्रपती क्रीडा मंडळ, विग्नहर्ता गणेश मंडळ, दुर्गामाता गणेश मंडळ, समर्थ गणेश मंडळ यांना उत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून यावेळी गौरविण्यात आले.