Jammu & Kashmir ३७० : राष्ट्राला उद्धेशून नेमके काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

My address to the people of India. https://t.co/f0q8rEUSkH
— Narendra Modi (@narendramodi) August 8, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्याप्रमाणे काळ रात्री ८ वाजता राष्ट्राला उद्देशून भाषण केले . जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करणे तसेच काश्मीरचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याच्या सरकारच्या निर्णयामागची भूमिका त्यांनी पहिल्यांदाच जनतेसमोर स्पष्ट केली. यावेळी बोलतांना त्यांनी आपली भूमिका पुढील प्रमाणे मांडली.
– जम्मू-काश्मीरमध्ये सर्वोत्तम टुरिस्ट डेस्टिनेशन बनण्याची क्षमता आहे. मला यासाठी देशवासियाच्या सहकार्याची आवश्यकता आहे.
– परिस्थिती सामान्य झाली तर काश्मीरमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होईल. यामुळे रोजगार वाढेल.
– चित्रपट सृष्टीने काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करावा.
– कलम ३७० हटवल्यानंतर नवे सदस्य पंचायत व्यवस्थेत काम करताना कमाल करुन दाखवतील हा माझा विश्वास आहे.
– जम्मू-काश्मीरची जनता फुटीरतवादाला पराभूत करेल.
– पंचायत निवडणुकीत निवडून आलेले लोक जम्मू-काश्मीरमध्ये चांगले कार्य करत आहेत.
– कलम ३७० हटवल्यानंतर नवे सदस्य पंचायत व्यवस्थेत काम करताना कमाल करुन दाखवतील हा माझा विश्वास आहे.
– जम्मू-काश्मीरची जनता फुटीरतवादाला पराभूत करेल.
– जम्मू-काश्मीरचा लोकप्रतिनिधी काश्मीरची जनताच निवडेल. केंद्रशासित प्रदेश असला तरी मंत्रिमंडळाची रचना आधी होती तशीच असेल.
– काश्मीरमध्ये सर्व काही सुरळीत झाल्यानंतर पुन्हा जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यात येईल.
– जम्मू-काश्मीरला केंद्राच्या अखत्यारित ठेवण्याचा निर्णय खूप विचार करुन घेण्यात आला आहे.
– राज्यपाल राजवट असल्यामुळे काश्मीरमध्ये आता सुशासन दिसत आहे. कागदावर असलेल्या अनेक योजना आता प्रत्यक्षात दिसत आहेत.
– जम्मू-काश्मीरमध्ये उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देणारे.
– नव्या व्यवस्थेत पोलिसांसह राज्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना अन्य राज्यांसारख्या सुविधा देण्याचा प्रयत्न.
– जम्मू-काश्मीरच्या पोलिसांना अन्य राज्यांच्या पोलिसांसारख्या सुविधा मिळत नाहीत. त्या लवकरच दिल्या जातील.
– काश्मीर आणि लडाखमध्ये रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया लगेच सुरु होईल. ज्यामुळे युवकांना रोजगार मिळेल.
– देशाच्या अन्य राज्यात मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे पण जम्मू-काश्मीरमध्ये मुले शिक्षणापासून वंचित होती. त्यांचा काय गुन्हा होता?
– देशातील अन्य राज्यांमध्ये मुलींना जे अधिकार मिळतात ते जम्मू-काश्मीरच्या मुलींना मिळत नाहीत.
– जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० चा पाकिस्तानने शस्त्रासारखा वापर केला.
– तीन दशकात ४२ हजार निष्पाप नागरीकांना प्राण गमवावे लागले.
– जम्मू-काश्मीर लडाखचा विकास त्या वेगाने होऊ शकला नाही.
– सरदार पटेल, बाबासाहेब आंबडेकर आणि कोटयावधी देशभक्तांचे जे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण झाले आहे.
– जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली आहे.