भाजपनेते अरुण जेटली एम्समध्ये दाखल, प्रकृती स्थिर

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांना वैद्यकीय चाचण्यांसाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वसनाचाही त्रास होत असल्याने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून अरुण जेटली यांची प्रकृती बरी नाही. आज त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने सकाळी ११ वाजता एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सूत्रांनी सांगितलं. थकवा, श्वसनाचा त्रास आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना एम्समध्ये भरती करण्यात आलं होतं.
प्रकृतीच्या कारणास्तव जेटली यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्रीपद स्वीकारण्यास नकार दर्शविला होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तशी चिठ्ठीच लिहिली होती. गेल्या १८ महिन्यांपासून मी आजारी आहे. त्यामुळे मला मंत्री बनविण्याचा विचार करू नका, असं जेटली यांनी या पत्रात नमूद केलं होतं.