Aurangabad : उल्लेखनिय कामगिरी करणा-या कर्मचा-यांचा पोलिस आयुक्तांचे हस्ते सत्कार

मासिक आढावा बैठकीत आयुक्तांनी केले कर्मचा-यांचे कौतूक
गेल्या सहा ते सात महिन्याच्या काळात पोलिस दलासाठी उल्लेखनिय कामगिरी करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शुक्रवारी (दि.९) पोलिस आयुक्तालयाच्या सभागृहात मासिक आढावा बैठकीत उल्लेखनिय कामगिरी करणा-या कर्मचा-याचे पोलिस आयुक्तांनी कौतूक केले तर कामचुकार अधिका-यांना कानपिचक्या दिल्या.
पोलिस आयुक्तालयाच्या सभागृहात झालेल्या मासिक आढावा बैठकीसाठी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासह पोलिस उपायुक्त मिना मकवाना, निकेश खाटमोडे पाटील, डॉ. राहुल खाडे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, शहर विभागाचे सहाय्यक आयुक्त हनुमंत भापकर, सिडकोचे सहाय्यक आयुक्त गुणाजी सावंत, उस्मानपुरा विभागाचे सहाय्यक आयुक्त रामचंद्र गायकवाड आदींची उपस्थिती होती. पोलिस दलासाठी गेल्या सहा ते सात महिन्याच्या काळात उल्लेखनिय कामगिरी करून अनेक किचकट गुन्हे उघडकीस आणून आरोपी जेरबंद करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा यावेळी पोलिस आयुक्तांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
सत्कार करण्यात आलेल्यांमध्ये सिडको डीबी पथकाचे उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, जमादार नरसिंग पवार, राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, स्वप्नील रत्नपारखी, सुरेश भिसे, किशोर गाढे, पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक महादेव पुरी, विकास खटके, प्रभाकर सोनवणे, जमादार रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, विठ्ठल फरताळे, बाळाराम चौरे, रवी जाधव, राजेश यदमळ, शिवाजी गायकवाड, जालींदर मांन्टे, प्रवीण मुळे, दिपक जाधव, विलास डोईफोडे, गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक अजबसिंग जारवाल, जमादार शिवाजी झिने, प्रकाश चव्हाण, राजेंद्र सोळुंखे, संदीप क्षिरसागर, प्रभाकर राऊत, संजय जाधव, गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार नंदकुमार भंडारे, जमादार संतोष सोनवणे, नंदलाल चव्हाण, रितेश जाधव, योगेश गुप्ता, लखन गायकवाड यांच्यासह लखनौ येथे ऑल इंडिया पोलिस कर्तव्य मेळाव्यात उल्लेखनिय कामगिरी करणारे सहाय्यक निरीक्षक राहुल खटावकर, जमादार मन्सूर शहा यांचा सत्कार करण्यात आला.