Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या तिन्ही मुलांवर गुंडगिरीचा आरोप , डोक्यावर फोडल्या बिअरच्या बाटल्या !!

Advertisements
Advertisements
Spread the love

बारमध्ये दारू पिण्यासाठी बसलेले असताना झालेल्या वादातून गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या तिघा मुलांनी व त्यांच्या साथीदारांनी विश्वनाथ गायकवाड या तरुणाच्या डोक्यावर बिअरच्या बाटल्या फोडून त्याला मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री रोडपालीतील गिरीराज रेस्टारंट अॅण्ड बारसमोर घडली. या मारहाणीत विश्वनाथ जखमी झाला असून त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisements

जगदीश गायकवाड यांची तीन मुलं सिध्दांत, संदेश आणि स्वप्निल या तिघांचे विश्वनाथ गायकवाडचा भाऊ सिद्धार्थ गायकवाडबरोबर किरकोळ वादातून भांडण झालं होतं. त्यामुळे नगरसेवकांची ही तिन्ही मुलं सिद्धार्थला शोधत होती. मात्र तो त्यांच्या हाती लागत नव्हता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी रोडपाली येथेली गिरीराज रेस्टॉरंट अँड बारमध्ये दारू पित असताना नगरसेवकाच्या या तीन मुलांनी विश्वनाथबरोबरच भांडण उकरून काढलं. त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक चकमक उडून प्रकरण हमरीतुमरीवर आले. या तिघां नगरसेवक पुत्रांनी अन्य चार-पाच जणांच्या मदतीने विश्वनाथला जबर मारहाण केली. या सात जणांनी विश्वनाथच्या डोक्यात बियरच्या बाटल्या आणि काचेचे ग्लास फोडले. त्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला. विश्वनाथला रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.

Advertisements
Advertisements

दरम्यान, या घटनेनंतर हल्लेखोर तरुणांनी पलायन केलं आहे. कळंबोली पोलिसांनी स्वप्नील, सिद्धांत, संदेश आणि तेजस चाफेकर या चौघांवर मारहाण करणे, शिवीगाळ करणे, धमकावणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला असून या चौघांचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!