Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Uttarpradesh : महिला पोलिसाने केले गँगस्टरशी लग्न , चर्चेतला विवाह !!

Spread the love

उत्तर प्रदेशच्या लखनौ मधील एका गँगस्टरच्या  प्रेमात आकंठ  बुडालेल्या महिला पोलिसाने थेट त्याच्यासोबत लग्नगाठच बांधण्याचा निर्णय घेतला आणि थाटामाटात लग्नही लावले . राहुल ठसराना असं गँगस्टरचं नाव आहे. या दोघांच्या आगळ्यावेगळ्या प्रेम कहाणीमुळे 2002 साली मोठ्या पडद्यावर झळकलेल्या ‘गुनाह’ (Gunaah)सिनेमाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. या सिनेमातही अभिनेत्री बिपाशा बसू पोलीस कर्मचाऱ्याची भूमिका तर अभिनेता डीनो मोरियानं आरोपीचं पात्र साकारलं होतं. सिनेमामध्ये या दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम असतं. अशीच काहीशी कहाणी गँगस्टर राहुल आणि उत्तर प्रदेशातील महिला कॉन्स्टेबलमध्येही दिसली. आश्चर्याची बाब म्हणजे या दोघांनीही सर्व कायदे-नियम विसरुन विवाहसोहळा देखील रचला.

दरम्यान, गँगस्टर राहुलवर 12 हून अधिक गुन्हेगारी खटले दाखल आहेत. 2014 मध्ये बहुचर्चित मनमोहन गोयल हत्याकांड प्रकरणी त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. कायद्याचं रक्षण करणारे पोलीस आणि गुन्हेगार या दोघांमध्ये प्रेम फुलल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राहुल जेव्हा कारागृहात कैद होता तेव्हा ही महिला पोलीस कर्मचारी तेथेच आपलं कर्तव्य बजावत होती. या दरम्यान, दोघं मनानं एकमेकांच्या जवळ आले. कारागृह परिसरात दोघंही लपून छपून भेटू लागले. यानंतर जशी कारागृहातून राहुलची सुटका झाली, तसं दोघांनीही थाटामाटात लग्न केलं.

2014 मधील मनमोहन गोयल हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी अनिल गिरोहच्या हस्तकांच्या मुसक्या आवळल्या होत्या. आरोपींमध्ये राहुलचाही समावेश होता. जमीन विवाद प्रकरणात कुख्यात गुंड अनिल दुजानानं आपल्या शार्प शूटर्सकडून व्यापारी गोयलची हत्या घडवून आणली होती. राहुल ठसरानानं 2008मध्ये गुन्हेगारी विश्वात पाऊल टाकलं. यापूर्वी तो सिकंदराबादमध्ये रिक्षा चालकाचं काम करत होता. हे काम करत असतानाच त्याची गिरोहच्या गँगमधील सदस्यासोबत ओळख झाली. या सदस्यामार्फतच त्यानं गुन्हेगारी विश्वाची वाट धरली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!