Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धावत्या रेल्वेत कैदी महिलेवर पोलीस कर्मचाऱ्यानेच केला बलात्कार

Advertisements
Advertisements
Spread the love

तिहार तुरूंगातील एका कैदी महिलेवर पोलीस कर्मचाऱ्यानेच धावत्या रेल्वेत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नवी दिल्लीत घडली आहे. पोलीस कर्मचाऱ्याने जिवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला, असा आरोप पीडित महिलेने केला असुन तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

तिहार तुरूंगात असलेल्या या महिलेविरूद्ध दिल्लीतील भजनपुरा येथे आणि पश्चिम बंगालमध्ये दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. पश्चिम बंगालमधील खटल्याच्या सुनावणीसाठी महिलेला न्यायालयात १ ऑगस्ट रोजी हजर करण्यात आले होते. यासाठी महिलेसोबत पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील दोन महिला आणि एक पुरूष कर्मचारी पाठवण्यात आले होते. दरम्यान, सुनावणीहून रेल्वेने परत येताना ही घटना घडली. ३-४ ऑगस्टला पोलीस महिलेसह रेल्वेने परत येत होते. रात्रीच्या वेळी महिलेने शौचालयात जायचे असे सांगितल्यावर महिला कर्मचारी तिला रेल्वेतील शौचालयातघेऊन गेल्या होत्या. याचवेळी तिथे आलेल्या पुरूष कर्मचाऱ्याने बाहेर उभ्या असलेल्या महिला पोलिसांना जागेवर जाण्यास सांगितले. त्यानंतर शौचालयात शिरून जिवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. दिल्लीत आल्यानंतर महिलेने झालेल्या घटनेची माहिती तिहार तुरूंगातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर हा गुन्हा दिल्ली पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आला असुन दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात महिलेच्या तपासण्यात करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी नमुने तपासणीसाठी पाठविले असुन अहवाल आल्यानंतरच सत्य समोर येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!