Mumbai : “त्या” सामूहिक अत्याचार पीडित मुलीची प्रकृती अद्यापही गंभीर, आयसीयुमध्ये उपचार सुरु

पीडितेला न्याय मिळाला पाहिजे हि आईची इच्छा ….
माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, पीडितेवर अत्याचार करुन तीचे जिवन उध्वस्त करणा-यांना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी पीडित मुलीच्या आईने प्रसिध्दी माध्यमांशी बोलतांना केली. तसेच पोलिस आणि घाटीतील डॉक्टरांकडून आपले खच्चीकरण करण्यात येवून आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही पीडितेच्या आईने यावेळी केला.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रहिवासी असलेल्या २० वर्षीय तरुणीवर मुंबईत सामुहिक बलात्कार झाल्याची घटना जुलै महिन्यात उघडकीस आली होती. सामुहिक अत्याचाराने मानसिक व शारीरिक धक्का बसलेल्या पीडित मुलीची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याची माहिती घाटीच्या अधिष्ठता डॉ.कानन येळीकर यांनी शनिवारी (दि.३) दिली. दरम्यान, पीडित मुलीला भेटण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकाNयांना रोखल्याच्या कारणावरुन घाटी रुग्णालयात वाद होवून काही काळ तणाव निर्माण झाला होता.
घनसावंगी तालुक्यातील रहिवासी असलेली २० वर्षीय तरुणीचे दोन भाऊ, वहिणी गेल्या पाच ते सात वर्षापासून मुंबईत रोजगारानिमित्त वास्तव्यास आहेत. पीडित मुलगी आपल्या भावाकडे राहण्यासाठी मुंबईला गेली होती. ७ जुलै रोजी पीडित तरुणी आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्याचे सांगून घराबाहेर गेली होती. ती सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरी परतली, त्यावेळी तिची प्रकृती खराब झाली असल्याचे तीने आपल्या वहिणीला सांगीतले. पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे तिला पॅरालिसिस झाला असेल असे समजून तिच्या भावाने वडिलांना मुंबईला बोलवून पुढील उपचारार्थ गावाकडे पाठविले होते परंतु तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही म्हणून तिला दि. २५ जुलै रोजी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान वैद्यकीय तपासणीत पीडितेवर सामुहिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यावर पीडितेच्या कुटुंबियांना जबर मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल करुन तो पुढील तपासासाठी चेंबुर येथील चुनाभट्टी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पीडितेचा जबाब घेण्यासाठी चुनाभट्टी पोलिस ठाण्याचे एक पथक शहरात दाखल झाले असून पीडितेची प्रकृती गंभीर असल्यामुळे पोलिसांनी पीडितेच्या आई-वडीलांचा जबाब नोंदवून घेतला असल्याची माहिती बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय साळवे, अभिषेक देशमुख, महिला आघाडीच्या शहर कार्याध्यक्षा प्रतिभा वैद्य, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या यशस्वी वाघमारे, सरताज सैय्यद व अन्य पाच ते सहा महिला कार्यकर्ता पीडितेला भेटण्यासाठी घाटी रुग्णालयात गेल्या होत्या. त्यावेळी घाटीतील रुग्णांनी राष्टवादीच्या कार्यकत्र्यांनी पीडितेला भेटता येणार नाही, असे सांगत राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाद झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
नसता रस्त्यावर उतरुन आंदोलन करु – विजय साळवे
जालना जिल्ह्यातील पीडित मुलीवर मुंबईत सामुहिक अत्याचार झाल्याची घटना अत्यंत निंदणीय आणि घृणास्पद आहे. पीडितेवर अत्याचार करणाNया आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी, नसता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करतील असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विजय साळवे यांनी यावेळी दिला.