Aurangabad : क्रीडा विभागाची गुरुवारी वार्षिक बैठक, डॉ.कटारे, डॉ.दुबे, डॉ.हुंबे यांचा गौरव

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाची वार्षिक क्रीडा नियोजन बैठक येत्या बुधवारी दि.सात रोजी मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.
सदरील बैठकीत २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील आखिल भारतीय आंतर विद्यापीठ, पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ आणि क्रीडा महोत्सव स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडु, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन सेवा निवृत्त झालेले क्रीडा संचालक यांचा सेवा गौरव मा.कुलगुरु यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामध्ये प्राचार्य डॉ.प्रदीप दुबे, प्राचार्य डॉ.भागवत कटारे, माजी अधिष्ठाता डॉ.आप्पासाहेब हुंबे, डॉ.बाबुराव गंगावणे, डॉ.युसुफ झई, डॉ.प्रल्हाद गोडबोले, डॉ.शाहुराव घोरपडे, डॉ.पांडुरंग भवर, डॉ.वसंत पाटील, डॉ.जयकुमार बारंगुळे, प्रा.शाहुराज माने या माजी प्राचार्य व क्रीडा संचालकांचा समावेश आहे. या बैठकीत मा.कुलगुरु हे क्रीडा संचालक व खेळाडुंना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत क्रीडा क्षेत्राात भरीव कार्य करणारे प्राचार्य, क्रीडा संचालक यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये मत्स्योदरी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.भागवत कटारे यांचा सेवागौरव करण्यात येईल. डॉ.कटारे यांनी अधिसभा, व्यवस्थापन परिषद, परीक्षा मंडळ, विद्या परिषद तसेच बीसीयुडी संचालक म्हणून काम पाहिले आहे. तर मराठवाडा सांस्कृतिक मंडळ क्रीडा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.प्रदीप दुबे यांचाही सत्कार करण्यात येईल. डॉ.दुबे यांनी अधिसभा, व्यवस्थापन परिषद, क्रीडा संचालक आदी पदांवर काम केले आहे. याप्रमाणेच माजी अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.आप्पासाहेब हुंबे यांचाही गौरव करण्यात येईल. दुस-या सत्रात डॉ.एम.आर.लांब हे क्रीडा संचालक तसेच खेळाडुंना ‘खेळ व आहार‘ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. दुपारच्या सत्राात आंतर महाविद्यालयीन स्पर्धेच्या आयोजनाचे वाटप हे सर्व महाविद्यालयांना करण्यात येणार आहे. तसेच आंतर महाविद्यालयीन स्पर्धा २०१९-२० स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे. नविन ‘ऑल इंडिया युनिव्र्हसिटीज‘च्या नवीन पात्रता नियमावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. सर्व महाविद्यालयाचे क्रीडा संचालक, खेळाडू यांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रभारी क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे यांनी केले आहे.