Aurangabad : गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा

नाशिक जिल्ह्यातीलधरण प्रकल्प क्षेत्रात सतत पाऊस चालू आहे. येत्या 3 -4 दिवसामध्ये आणखी पावसाची शक्यता लक्षात घेता. नाशिक जिल्ह्यातून खालच्या प्रकल्पामध्ये मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. सततच्या पावसाने हा विसर्ग वाढत आहे. त्यामुळे गोदावरी नदीमध्ये पाण्याचा प्रवाह मोठ्याप्रमाणावर सुरु झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या जमिनीमध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे. तरी संबधित तहसील स्तरावरिल प्रशासकीय मुख्य संबधित विभाग प्रमुख, तसेच नागरिक यांना आपले स्तरावरुन विशेष दक्षता घेणेबाबत सूचना देण्यात याव्यात, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
अ.क्र. | प्रकल्पाचे नाव | धरणात येणारी आवक | धरणाची
टक्केवारी |
एकूण साठा | धरणाचा जिवंत साठा |
1 | जायकवाडी प्रकल्प | 32,008
Cusecs |
10.48% | 965.788
दलघमी |
227.682दलघमी |
प्रकल्पाच्या वरील आकडेवारी (दि-03/08/2019 व वेळ:-14.00 दुपारी)
जेणे करून संभाव्य अप्रिय घटना घडू नये.याची दक्षता घेण्याच्या सूचनाही प्रसारीत कराव्यात. या कामी निष्काळजीपणा व हलगर्जीपणा होऊ नये याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी. तसेच सततच्या वाढत्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा ईशारा देण्यात यावा. गोदावरी नदीपात्रात मोठ्याप्रमाणात पाण्याचा येवा लक्षात घेता. नमूद स्थितीच्या अनुषंगाने नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करु नये, नदी क्षेत्रात विहार करु नये अथवा जनावरांना मोकळे सोडू नये. नौका विहार टाळावा, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
विविध प्रकल्पाच्या धरणातील विसर्ग व आवक :
अ.क्र. | प्रकल्पाचे नाव | प्रकल्प/धरणातून होणारा विसर्ग क्युसेक मध्ये |
1 | नांदूर मधमेश्वर | 83773 Cusecs |
2 | नागमठाण | 38840 Cusecs |
3 | दारणा | 23192 Cusecs |
4 | गंगापूर | 15426 Cusecs |
5 | कडवा | 7056 Cusecs |
6 | ओझर वेअर | 7656 Cusecs |
7 | पालखेड | 5307 Cusecs |