‘जिसने छोडा मोदीजीका साथ उसका होगा सत्यानाश’ : जनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांचा शाप !!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा राज्यभरात सुरु झाली आहे. गुरुवारी अमरावती येथील संत गाडगेबाबा यांच्या कर्मभूमीतून या यात्रेला शुभारंभ झाला. त्यानंतर आज म्हणजे शुक्रवारी ही यात्रा नागपुरात धडकली. नागपूरच्या काटोल येथे सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची माफी मागितली. त्यानंतर भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्यांवर फडणवीस बरसले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘काही लोक पळपुटेपणा करून सोडून गेले.’ त्याचबरोबर ‘जिसने छोडा मोदी का साथ, उसका होगा सत्यानाश’, असेही फडणवीस म्हणाले.
गेल्या वर्षी भाजपचे कटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत थेट भाजपाला आव्हान दिले होते. आणि हाच राग मनात धरत आज मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता आशिष देशमुख यांच्यावर टीका केली. दरम्यान आशिष देशमुख यांचे आव्हान हे कटोलमधून भाजपच्या उमेदवाराला असणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट ‘जिसने छोडा मोदी जिंका साथ उसका होगा सत्यानाश’, असे म्हटले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मला तुमची माफी मागायची आहे. कारण मागच्या वेळीही जनादेश मागायला आलो होतो. तुम्ही जनादेश दिला देखील. पण काही लोक पळपुटेपणा करून सोडून गेले. ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची साथ दिली त्यांचा सर्वनाश होणार आहे.’ त्याचबरोबर पात्र उमेदवार निवडूण द्याल, अशी खात्री असल्याचेही फडणवीस म्हणाले.